मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आलं नाही असंही कंबोज यांनी म्हंटलं. मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट कंबोज यांना आव्हान देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. 'जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा', अस आव्हान भास्कर जाधव यांनी कंबोज यांना दिलं आहे.
#MohitKamboj #BhaskarJadhav #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #SanjayRaut #NeelamGorhe #SambhajirajeChhatrapati #MaharashtraAssembly #BJP #Politics #Maharashtra #MarathiNews